Physical Address

304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

vehicle stolen complaint online

वाहनचोरीची तक्रार करा ऑनलाईन!

वाहनचोरीची तक्रार करा ऑनलाईन!

वाहनचोरीच्या गुन्ह्यांची तातडीने नोंदणी व्हावी यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी वाहनचोरी तक्रार नावाचे नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या आधारे वाहनचोरीची तक्रार एका चुटकीसरशी करता येणे शक्य आहे. ऑनलाईन तक्रारीमुळे वाहननोंदणीचे गुन्हे थेट दाखल होतील. यात, मानवी हस्तक्षेप नसल्याने तक्रार दाखल करताना चालढकल होणार नाही.

वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमुळे अनेकदा गुन्हे उशिराने दाखल होतात. संबंधीत वाहनधारकास पोलिस स्टेशनला चक्करा माराव्या लागतात. चोरी गेलेल्या वाहनाच्या मदतीने गंभीर गुन्हे झाल्यास त्याचा थेट मनस्ताप वाहनधारकास भोगावा लागतो. यापार्श्वभूमीवर महराष्ट्र पोलिसांनी राज्य पातळीवर वाहन चोरी तक्रार नावाचे पोर्टल सुरू केले आहे. इंटरनेटच्या मदतीने वाहनधारक घरबसल्या वाहनचोरीची तक्रार नोंदवू शकतो. तक्रार नोंदवल्यानंतर तपासाबाबतची माहितीही वाहनधारकास समजणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेल्या www.vahanchoritakrar.com या पोर्टलवर जावून प्रथम आपल्याला नोंदणी करावी लागेल.

यासाठी,

  • स्वतःचा मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आय डी
  • आधार कार्ड नंबर
  • स्वतःचे नाव
  • स्वतः चा पासवर्ड ठरवुन (Desired Password) भरावा लागेल.

या माहितीच्या आधारे आपली विनंती रजिस्टर करावी. पोर्टलचा गैरवापर टाळण्यासाठी एक वन टाईम पासवर्ड (OTP) आपण नोंदवलेल्या ई-मेंल वर येईल. तो पासवर्ड बॉक्स मध्ये भरून सबमीट करन नोंदणी करावी. एकदा नोंदणी झाल्यानंतर, आपला नोंदवलेला मोबाईल नंबर, ठरवलेला पासवर्ड आणि व्हेरीफिकेशन कोड (Captcha) टाकून आपण लॉगीन करू शकतो. लॉगीन केल्यानंतर आपल्या हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या वाहनाची तक्रार करता येऊ शकते.

वाहनाची ही माहिती आवश्यक

वाहनचोरीची ​किंवा हरवल्याची तक्रार नोंदवताना वाहनधारकास

  • वाहनाचा प्रकार
  • वाहनाची कंपन
  • वाहनाचा नोंदणी क्रमांक
  • चेईसीज नंबर
  • इंजिन नंबर
  • वाहनाचे उत्पादीत वर्ष
  • वाहनाचा रंग
  • वाहन ज्याच्या नावावर आहे त्याचे नाव
  • वाहन हरवले किंवा चोरी गेले ते ठिकाण
  • जिल्हा
  • चोरी गेल्याची कालावधी नमुद करावा लागेल.

 

या पोर्टलचा वापर राज्यस्तरावर होणार असला तरी वाहनधारकाच्या माहितीनुसार संबंधीत पोलिस स्टेशनला ती तक्रार वर्ग होईल. तक्रारीवर तसेच तपासावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवतील. तक्रारदाराशी पोलिस संपर्क साधतील. आवश्यकतेनुसार वैयक्तिक माहिती केव्हांही अप-डेट करू शकता. तक्रार खोटी, चुकीची, कोणाला त्रास देण्याच्या हेतुने असल्याचे समोर आल्यास कारवाई होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *